लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू; प्रवाशांना काहीसा दिलासा
कणकवली : राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला परिवर्तित करण्यात आलेल्या सीएनजी बसेससह आतापर्यंत नवीन २५ लालपरी गाड्याही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही काळापासून स्थगित असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या आता सुरू करण्यात आल्या आहेत. यात सावंतवाडीहून फोंडामार्गे सोलापूर, गाणगापूर ही बस दुपारी १ वाजता सुटणार आहे. तर परतीसाठी गाणगापर येथन दुपारी २:४५ वाजता सुटणार आहे. कणकवली आगारातून सकाळी ९:३० वाजता सोलापूर बस सुटणार असून, परतीसाठी सोलापूरहून सकाळी ७:४५ वाजता सुटणार आहे. कणकवली आगारातून दुपारी १ वाजता लातूर बस सुटणार असून, परतीसाठी लातूर येथून सायंकाळी ७ वाजता सुटणार आहे. विजयदर्ग आगारातन विजयदर्ग- नाटे-बोरिवली ही बस दुपारी २:४५ वाजता सुटणार आहे तर परतीसाठी बोरिवली येथून सायंकाळी ६ वाजता सुटणार आहे. नव्याने प्राप्त झालेल्या २५ लालपरी गाड्यांपैकी मालवण व कणकवली एसटी आगाराला प्रत्येकी ८ गाड्या, देवगड आगाराला सहा तर विजयदुर्ग आगाराला तीन गाड्या देण्यात आल्या आहेत. तर परिवर्तित करण्यात आलेल्या आतापर्यंत सुमारे ४४ सीएनजी गाड्याही सिंधुदुर्ग विभागात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा देणे एसटी महामंडळाला काहीसे सलभ होणार आहे.