काही दिवसांपूर्वी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर झाले होते बेचिराख
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी केली पहाणी
कणकवली : काही दिवसापूर्वी तालुक्यातील माईन उपसरपंच अनिल सुखटणकर यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून पूर्ण घर बेचिराख झाले होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी सदर घराची पहाणी केली. व अनिल सुखटणकर यांना छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळातर्फे पन्नास हजाराची आर्थिक मदतीचा हात पुढे केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत, माईन सरपंच नितीशा पाडावे, राजू हिर्लेकर, बाबू घाडी, समीर प्रभुगावकर व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.