या लोककल्याणकारी व पारदर्शक योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. — तलाठी संतोष सावंत
फोंडाघाट मध्ये चावडी वाचन संपन्न
फोंडाघाट : ” जिवंत सातबारा ” योजनेअंतर्गत फोंडाघाट ग्रामपंचायतच्या छ.शिवाजी महाराज सभागृहात चावडी वाचन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. संजना आग्रे,सदस्य पिंटू पटेल, तलाठी संतोष सावंत आणि शेतकरी उपस्थित होते.
तलाठी संतोष सावंत यांनी जिवंत सातबारा या शासनाच्या योजनेची माहिती दिली. खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज मिळावेत.वारस नोंदणी प्रक्रियेत अनेक वर्ष दिरंगाई होत असल्याने, शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ही वेळ खाऊ प्रक्रिया सहज सोपी होऊन, पारदर्शकता यावी. यासाठी ही योजना कायद्याच्या चौकटीत लोककल्याणकारी ठरणार आहे.यावेळी शेतकऱ्यांच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅग ची नोंदणी प्रामुख्याने करण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली.
यावेळी या योजनेसाठी शुभेच्छा देताना, सरपंच सौ संजना आग्रे यांनी, स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले .मात्र या चावडीवाचनाची उपस्थिती पाहता ग्रामपंचायत सदस्य,व शेतकऱ्यांची उदासीनता स्पष्ट होत होती…