राममंदिर हळवल येथे दि.३० मार्च ते ०६ एप्रिल २०२५ या दरम्यान संपन्न होणार सोहळा कार्यक्रम
कणकवली : श्रीराम सेवा मंडळ मुंबई मु.पो.हळवल,ता. कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावतीने रामनवमी उत्सव व प्रथम वर्धापन दिन सोहळा दि.३० मार्च ते रविवार दि.०६एप्रिल २०२५ या दरम्यान संपन्न होणार असून मंदिरात होणारे दैनंदिन कार्यक्रम व श्रीराम नवमी उत्सव सांगता समारंभात ग्रामस्थ,भाविक बंधू भगिनींनी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळी सह या सोहळयास उपस्थित राहून श्रीराम दर्शन व तिर्थप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा अशी नम्र विनंती श्रीराम सेवा मंडळ मुंबई (हळवल) यांच्यावतीने करण्यात आली आहे.
श्रीराम नवमी उत्सव दैनंदिन कार्यक्रम दि. ३० मार्च २०२५ ते मंगळवार दि. ०६ एप्रिल २०२५ यादरम्यान संपन्न होणार आहेत.सायं६.३० ते ७.३० भाविक, बाळ गोपाळ आणि वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ,रात्रौ ८ते ९ प्रदक्षिणा, रात्रौ ९.३० ते ११.०० वारकरी संप्रदाय मंडळाचे कीर्तन शनिवार दि.०५/०४/२०२५ रोजी ह.भ.प. पैठणकर महाराज,
श्रीरामनवमी कार्यक्रम
रवि. दिनांक ०६ एप्रिल २०२५ सकाळी ८ ते ९.३० वाजता आस्तिक बँड पथक -वरळी कोळीवाडा,मुंबई यांचे सुस्वर बँड वादन,सकाळी ८.३० वा.श्रीराम षोडशोपचार पुजा,सकाळी ९.०० वा.उत्सवाचं ग्रामदेवतेला आमंत्रण, सकाळी १०.००वा. श्रीराम जन्माचे कीर्तन -ह.भ.प. नामदेव पांडुरंग महाराज,दुपारी १२.०० वा. राम जन्म सोहळा दर्शन व तिर्थप्रसाद, दुपारी १.०० वा. श्रीराम पालखीचे अभंग ढोल ताशांच्या गजरात व राम नामाच्या जयघोषात प्रदक्षिणा, दुपारी १.३०वा. महाप्रसाद सायं.६ ते ७वा.वारकरी भाविक व बाल गोपाळांचा हरिपाठ, रात्रौ ८ ते ९ श्रीराम प्रासादिक भजन मंडळ, हळवल यांचे भजन,रात्रौ ९ वा. श्रीराम पालखीचे अभंग टाळ ढोलताशाच्या गजरात व श्रीराम नामाच्या जय घोषात प्रदक्षिणा,रात्रौ ११ वाजता कीर्तन,रात्रौ १२ वाजता दशावतारी नाटक (श्री शिवराई रवळनाथ नाट्यमंडळ,हळवल संचालक-अरुण राणे) तसेच दिनांक ०७ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमी उत्सव समाप्ती व महाप्रसाद कार्यक्रम दुपारी १.०० ते ३.००वा होणार आहे.
श्रीराम मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक ०५एप्रिल २०२५ रोजी संपन्न होणार आहे. सकाळी १०.०० वाजता श्रीरामाची षोडशोपचार , पूजा,अभिषेक आरती व तीर्थप्रसाद, सकाळी ११.००वा. आस्तिक ब्रास बँड पथक -वरळी मुंबई यांचे सुस्वर बँड वादन -सौजन्य पंचमुखी हनुमान सेवा मंडळ वरळी मुंबई, दुपारी ०१.०० वाजता महाप्रसाद सौजन्य-श्री अनिल तुकाराम राणे परिवार हळवल सर्व सोहळ्यास सर्व ग्रामस्थ, भाविक बंधू भगिनींनी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळी सह उपस्थित राहून श्रीराम दर्शन व तिर्थप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा अशी नम्र विनंती श्रीराम सेवा मंडळ मुंबई (हळवल) यांच्यावतीने करण्यात आली आहे.