7.6 C
New York
Tuesday, April 8, 2025

Buy now

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघात क्रीडा स्पर्धांचे आयोजन

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती

१० एप्रिलला कृषीभवन येथे वाढदिवस, पारितोषिक वितरण….

कणकवली : खासदार नारायण राणे यांचा १० एप्रिल ला ७४ वा वाढदिवस साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघात विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत. तसेच यंदाचे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. तर संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी १० एप्रिलला सायंकाळी सहा वाजता सिंधुदुर्गनगरी येथील कृषी भवन येथे वाढदिवस साजरा होणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज दिली.

प्रभाकर सावंत यांनी कणकवली प्रहार भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. मिलिंद कुलकर्णी, मंडळ अध्यक्ष बंडया नारकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर आदी उपस्थित होते.

प्रभाकर सावंत म्हणाले, जिल्ह्यामध्ये खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस म्हणजे दहा एप्रिल हा चैतन्याचा दिवस असतो. विविध स्तरावरील नागरिक त्यांना शुभेच्छा देत असतात, म्हणूनच संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी १० एप्रिलला सायंकाळी सहा वाजता सिंधुदुर्गनगरी येथील कृषी भवन येथे वाढदिवस साजरा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धांचे पारितोषिकही वितरित होईल. वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यामध्ये आरोग्य शिबिर, विविध सामाजिक उपक्रम होत आहेत. यंदा वैशिष्ट्यपूर्ण व मतदार संघामध्ये विविध कार्यक्रम साजरे होत असून लोकसभेच्या सहा ही विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक तालुक्यात क्रीडा महाकुंभ सोहळा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथम कणकवली तालुक्यामध्ये आठ आणि नऊ एप्रिल रोजी कणकवली शहरातील नगरपंचायत हॉलमध्ये बॅडमिंटन स्पर्धा जिल्हास्तरावर होत आहे. तसेच तायक्वांदो ही स्पर्धा होणार आहे.

देवगड तालुक्यामध्ये १० एप्रिलला सायंकाळी सायकल रॅली स्पर्धा देवगड आणि जमसांडे येथे होईल. वैभववाडी तालुक्यांमध्ये ८ एप्रिलला रस्सिखेच स्पर्धा दुर्गामाता पटांगण येथे होणार आहे.

मालवण येथे ९ एप्रिलला जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा टोपीवाला मैदान येथे होणार असून १० एप्रिलला मालवण देऊळवाडा ते कोळंबबीच येथे मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. कुडाळ येथे १० एप्रिलला जिल्हास्तरीय कॅरम आणि बुध्दीबळ स्पर्धा वासुदेवानंद सभागृह येथे होणार आहे. सावंतवाडीत ६ एप्रिलला मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच वेंगुर्ला येथे सात आणि आठ एप्रिलला जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा वेंगुर्ला कॅम्प येथे होईल.

दोडामार्ग मध्ये ९ एप्रिलला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १० एप्रिलला खुल्या बैलगाडी स्पर्धा होत असून रत्नसिंधू महाराष्ट्र केसरी अशी ही स्पर्धा आहे. देवरुख येथील काझी मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर येथे ११ एप्रिलला सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत होम मिनिस्टर स्पर्धा होणार आहे. तसेच राजापूर हायस्कूल येथे १० एप्रिलला हॉलीबॉल स्पर्धा होणार आहे.

दहा एप्रिलला वाढदिवसाच्या कार्यक्रम देवरूख येथील मराठा भवन येथे सकाळी दहा ते बारा या वेळेत होईल. याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये विकास कामांची भूमिपूजन आणि झालेल्या कामांचे लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये सर्व भाजपचे पदाधिकारी सहभागी होणार असून सहकार्य ही करणार आहेत. अत्यंत नियोजनबद्ध अशा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. सावंत यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!
WhatsApp Group