27.9 C
New York
Tuesday, August 26, 2025

Buy now

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांचा कनेडी हायस्कूल येथे वाढदिवस साजरा

शिक्षण क्षेत्रात राजकारण न आणता संस्थेच्या हितासाठी काम करणार असल्याचा दिला विश्वास

कै. सुधीर श्रीधर सावंत यांच्या स्मरणार्थ एक वर्ग खोली बांधण्यासाठी दहा लाख रुपये देण्याची केली घोषणा

कणकवली – कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे संचालक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त कनेडी हायस्कूलच्या न्यानदीप सभागृहात संस्थेच्यावतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना, संदेश सावंत यांनी आपण या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. या शाळेची, संस्थेची प्रगती व्हावी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी ही संस्था ताब्यात घेण्यासाठी आपण पुढाकार घेतला होता. माझ्या आयुष्यात मी ठरवलेलं आहे. शिक्षण क्षेत्र व धार्मिक क्षेत्रात राजकारण करणार नाही. परंतु संस्थेने मी पणा न आणता, आम्ही म्हणून काम केल्यास यापुढेही संस्थेच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही दिली. संदेश सावंत यांनी आपले बंधू कै. सुधीर श्रीधर सावंत यांच्या स्मरणार्थ एक वर्ग खोली बांधण्यासाठी दहा लाख रुपये देण्याची घोषणा यावेळी केली.

या कार्यक्रमाला संस्थेचे सरचिटणीस शिवाजी सावंत, संचालक संजय सावंत, व्ही. बी. सावंत, मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण जेष्ठ ग्रामस्थ मनोहर सावंत, रमेश सावंत, संतोष सावंत, श्रीकांत सावंत, मिलिंद बोभाटे, विलास सावंत शिक्षक विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!