रामगड : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन शैक्षणिक वर्ष 24/25 साठी हे अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात आले होते. त्यानुसार मूल्यांकन समितीने आपल्या थंशाळेची तालुकास्तरावर निवड केली होती. संपूर्ण मालवण तालुक्यातील माध्यमिक शाळातून आपल्या शाळेला या अभियानामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. हे अभियान शासनाच्या निकषाप्रमाणे आपण राबवले असल्यामुळे रुपये दोन लाख रुपयाचा पुरस्कार आपल्याला मिळाला. गटशिक्षणाधिकारी कार्यालय व पंचायत समिती मालवण यांच्या विद्यमाने या अभियानामध्ये विजेत्या ठरलेल्या शाळांचा सत्कार समारंभ व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मालवण तालुका तहसीलदार श्रीमती वर्षा झालटे मॅडम तसेच मालवण तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री प्रफुल्ल वालावलकर उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये आपल्या पंचक्रोशी सर्वोन्नती मंडळ रामगड संचलित प्रगत विद्यामंदिर रामगड प्रशालेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. प्रभूदेसाई साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय श्री. सुभाष तळवडेकर, उपसचिव श्री. ज्ञानदेव वाघ प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री ए. एम. वळंजू तसेच क्रीडा शिक्षक श्री डी. डी सावंत उपस्थित होते.