कणकवली | मयुर ठाकूर : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (२०२४-२५) या परीक्षेत शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. कुमार आदित्य दीपक कोरगावकर व अनिरुद्ध विश्राम केणी अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वि पर्यंत प्रतिवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती केंद्र सरकारकडून मिळणार आहे. तसेच या परीक्षेतून कुमार तन्मय लक्ष्मण गावडे सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे. या यशाबद्दल शिवडाव सेवा संघ मुंबई चे अध्यक्ष श्रीरंग शिरसाट, कार्याध्यक्ष मोहन पाताडे, कार्यवाह काशिराम गावकर तसेच इतर पदाधिकारी व शालेय समिती अध्यक्षा भाग्यरेखा दळवी, खजिनदार विद्याधर गावकर, सदस्य विजय सावंत, सदस्य आर्किटेक्ट गणेश म्हसकर, शिवडाव माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक मुकेश पवार, रिया गोसावी यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.