कणकवली : कणकवली, विद्यानगर येथील नक्षत्र अपार्टमेंटमध्ये राहणारे हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण यांच्या फ्लॅटमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इमारती खाली उभी करून ठेवलेली दुचाकी असा १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडेच कामाला असणाऱ्या कामगाराने लंपास केला आहे. या चोरीप्रकरणी कणकवली पोलिसांनी त्या कामगारावर गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नक्षत्र अपार्टमेंटमध्ये आपण पत्नी प्रतीक्षा हिच्यासह राहतो. आपण कन्स्ट्रक्शनचे काम करतो. आपल्याकडे पंधरा दिवसांपासून मूळ नेपाळचा रहिवासी असलेला रणजीत बैसवाल (२८) हा कामगार प्लास्टरचे काम करण्यासाठी होता. तो आमच्याच घरीच राहत असून, त्याचे जेवणखाणही आमच्याकडेच होत असे. ३१ मार्च रोजी नसपाडवा असल्याने माझ्या पत्नीने तिचे नवीन कपडे, सोन्याचे दागिने हे बाहेर टेबलावर काढून ठेवले होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आपण पत्नीसह सामान खरेदी करण्यासाठी कणकवली बाजारात गेलो होतो. त्यावेळी कामगार रणजीत हा घरी एकटाच होता.