कणकवलीत हळवल फाटाजवळ रिकाम्या जागेत भंगारव्यावसायिकाची करामत
कणकवली – शहरा नजीक असलेल्या गडनदी, हळवल फाटा येथील वळणावर असलेल्या रिकाम्या जागेत एका भंगार व्यवसायिकाने दोन दिवस या ठिकाणी आपल्याला नको असलेले भंगार चे सामान, स्पंच यासारखे कुजलेल्या वस्तू रिकाम्या जागेत आणून टाकल्या. त्या वस्तू टाकण्यासाठी त्याने आयशर टेम्पो चा वापर केला. साधारणपणे दोन वेळा ट्रिप मारून ते मटेरियल येथील रिकाम्या जागेत टाकले. त्या सामानाला सोमवारी सकाळी आजूबाजूला कोणीही नसताना आग लावली. यावेळी त्या आगीमुळे काळाकुट्ट धूर आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. एकंदरीत जर पाहिलं तर अशा प्रकारांना परवानगी देत कोण ? ते नको असलेले आणि दुर्गंधीयुक्त सामान टाकणारा तो भंगार व्यवसायिक नेमका कोण ? प्रशासन या प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.