कणकवली : हळवल येथील शिवजयंती उत्सव मंडळ यांच्यावतीने १७ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. १७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता शिवप्रतिमेचे पूजन, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांचा हरिपाठ, रात्री ८:३० वाजता आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार २०२५ प्रदान सोहळा, रात्री ९ वाजता ग्रामदेवता दशावतार नाट्यमंडळ, बिडवाडी यांचे दशावतारी नाटक होणार आहे. या कार्यक्रमाला शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव मंडळ, हळवलच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते राजू राणे यांनी केले आहे.