कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पाट तिठ्यावर शाळकरी मुलीला डंपरने चिरडले असून यात मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. मनस्वी सुरेश मेथर असे या मुलीचे नाव असून ती इयत्ता १० वी मध्ये शिकत होती. या अपघातानंतर गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी वाळू व्यावसायिकांना यावर जाब विचारला.