बांदा : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुना पत्रादेवी – बांदा रोड येथे अवैध दारू वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साईज विभागाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. यात ३ लाख २५ हजार २०० रुपयांची दारू व १० लाख रुपयांची कार असा एकूण १३ लाख २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दारू वाहतुकीसाठी वापरलेली कार (एमएच ०५ एएस ७७५०) ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी चालक प्रथमेश दिपक भाटकर (२९, रा.तवसाळ, गुहागर, रत्नागिरी) यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाई निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर, विवेक कदम, धनंजय साळुंखे, जवान रणजीत शिंदे, दिपक वायदंडे, सागर सुर्यवंशी, अभिषेक खत्री यांनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर करीत आहेत.