मालवण शहर प्रवक्तेपदी महेंद्र म्हाडगुत
युवासेना मालवण शहरप्रमुख पदी सिद्धेश मांजरेकर*
युवतीसेना मालवण तालुकाप्रमुख पदी भाग्यश्री लाकडे
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये मालवण शहर प्रवक्तेपदी महेंद्र म्हाडगुत, युवासेना मालवण शहरप्रमुख पदी सिद्धेश मांजरेकर व युवतीसेना मालवण तालुकाप्रमुख पदी भाग्यश्री लाकडे यांची निवड करण्यात आली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, उमेश मांजरेकर,मनोज मोंडकर,हेमंत मोंडकर,किरण वाळके,दीपक देसाई,सुरेश मडये, नरेश हुले,स्वप्नील आचरेकर,करण खडपे, महेश मेस्त्री,नंदू गवंडी, सुहास वालावलकर,किशोर गावकर, गौरव वेर्लेकर, राहुल जाधव, सदानंद लुडबे, गजानन नेवाळकर,राजा शंकरदास, फारूक मुकादम, मंदा जोशी,विद्या फर्नांडिस, रूपा कुडाळकर, नीना मुंबरकर, दीपाली शिंदे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.