तीन दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज ; पोलीस घटनास्थळी दाखल
कणकवली : शहरातील महापुरुष कॉम्प्लेक्सच्या मागील एका चिंचोळ्या भागामध्ये अज्ञात तरुणाचा टेकून बसलेल्या स्थितीत मृतदेह सापडला आहे. काळ्या रंगाचे टी-शर्ट व पॅन्ट व चेहऱ्यावर दाढी असलेल्या वर्णनाचा मृतदेह सापडला आहे.जवळपास तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस मारुती जगताप सहकारी पोलिसांसमवेत घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र सदर तरुणाची ओळख पटली नसून या तरुणाची आत्महत्या की घातपात याची उलट सुलट चर्चा होत आहे.
पोलिसांनी दर्शविलेल्या प्राथमिक अंदाजानुसार हा घातपात नसावा अशी माहिती दिली आहे. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, महेश शेडगे, दाजी सावंत, पांडुरंग पांढरे, भूषण सुतार आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
घटनास्थळी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम देखील सुरू करण्यात आले असून घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.