युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे उद्धाटन
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : पडेल तानवडेवाडी आयोजित व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत “भगवा चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या “भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन संपन्न झाले. उपजिल्हाप्रमुख यदुनाथ ठाकूरदेसाई यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी तानवडेवाडी मंडळाच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. अश्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून गावातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत व त्यांनी फक्त गावपातळीवर न खेळता पुढे जिल्हास्थरीय व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळावे व आपल्या तालुका जिल्ह्याचे नाव मोठे करावे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत उपजिल्हा प्रमुख यदुनाथ ठाकूर देसाई, युवासेना तालुकाप्रमुख फरीद काझी, उपविभाग प्रमुख चंदू तानवडे, पडेल शहर प्रमुख शेखर सुतार, युवासेना पडेल शाखाप्रमुख गणेश तानवडे, शिवसेना पडेल शाखाप्रमुख अजिंक्य तानवडे, ग्रामपंचायत सदस्य सानिका तानवडे, सिद्धेश पाटणकर, माजी सरपंच संजय मुळम, विकास दीक्षित, देवेंद्र तानवडे, चिराग तानवडे आदी खेळाडू व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.