वैभववाडी : एडगांव नजीक सिलेंडरचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक मधील सिलेंडर हे रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अपघात बुधवारी सायंकाळी ३ वा. च्या दरम्यान झाला. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली नव्हती. वैभववाडीहून कोल्हापूरकडे हा ट्रक जात होता. तरेळे ते गगनबावडा महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यातच नुकताच हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. ट्रक चालकाला रस्त्याच्या साईड पट्टीचा अंदाज न आल्याने ट्रक रस्त्याच्या बाहेर पलटी झाला. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले आहे. उशिरापर्यंत या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली नव्हती.