7.6 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

वाभवे – वैभववाडी न. पं. च्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड

वैभववाडी : वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यपदी प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपनगराध्य संजय सावंत यांनी पक्षाच्या धोरनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी प्रदीप रावराणे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. पिठासीन अधिकारी जगदीश कातकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी मुख्याधिकारी प्रतीक थोरात उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेविका नेहा माईणकर, नगरसेवक रणजित तावडे, नगरसेवक रोहन रावराणे, नगरसेवक विवेक रावराणे, नगरसेवक राजन तांबे, नगरसेवक सुभाष रावराणे, नगरसेविका संगीता चव्हाण, नगरसेविका दर्शना पवार, नगरसेविका यामिनी वळवी, यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच माजी उपसभापती बंडया मांजरेकर, शांतेश रावराणे, मारुती मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन रावराणे यांचे अभिनंदन केले.

प्रदीप रावराणे यांच्या नावाची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार अतिषबाजी केली. तसेच ढोल तशाच्या गजारात आनंद साजरा करण्यात आला. निवडीनंतर रावराणे यांनी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

संपादक – मयुर ठाकूर 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!