7.5 C
New York
Tuesday, March 11, 2025

Buy now

कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

पाककला स्पर्धा व फनी गेम्स चे आयोजन, पदर प्रतिष्ठान अध्यक्ष मेघा गांगण यांची उपस्थिती

कणकवली | मयुर ठाकूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कलमठच्या वतीने ग्रामपंचायत श्री देव काशीकलेश्वर सभागृहात महिला पाककला स्पर्धा व फनी गेम्स आयोजन करण्यात आले होते, या महिला दिनाला कन्नड गावातील बहुसंख्य महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा उद्घाटन माजी नगराध्यक्ष व कणकवली पदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौ मेघा गंगा यांच्या हस्ते करण्यात आले. या पूर्ण धान्य पाककल्या स्पर्धेमध्ये कळवण गावातील ४० महिलांनी सहभाग दर्शविला तर पाणी गेम्स मध्ये ७८ महिलांनी सहभाग घेतला. विजेत्या महिलांना वस्तू रुपात बक्षीस देण्यात आली. गावातील महिलांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचा ग्रामपंचायतीचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सौ मेघा गांगण म्हणाल्या, कलमाड ग्रामपंचायत महिलाच नाही गाव या संकल्प आवर गेली दोन वर्षे काम करत असून गावातील महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिलो, त्याचाच एक भाग म्हणून आज आपण करणार गावांमध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

विजेत्या स्पर्धक मध्ये.पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक समृद्धी पवार, द्वितीय क्रमांक सोनाली मेस्त्री,तृतीय क्रमांक नंदिनी मर्तल उत्तेजनार्थ सुवर्णा तांबे, तर फनी गेम्स मध्ये प्रथम क्रमांक स्वप्नाली मोडक, द्वितीय क्रमांक स्वाती चिंदरकर, तृतीय क्रमांक जांभुर्ले, उत्तेजनार्थ दिव्या खरात, प्राची चव्हाण यांना किचन गिफ्ट आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पाककला स्पर्धेचे परीक्षण आरती वायंगणकर यांनी तर फनी गेम्स स्पर्धेचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले. यावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, पदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मेघा गांगण, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर,स्वच्छ भारत मिशनच्या नम्रता कुडाळकर ,ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर , तनोज कळसुलकर, सचिन पेडणेकर उपस्थित होते, तर कार्यक्रम यशस्विते साठी सदस्या सुप्रिया मेस्त्री, तनिष्का लोकरे ,स्वाती नारकर, प्रियाली आचरेकर ,नजराना शेख,प्रीती मेस्त्री, हेलन कांबळे ,निशा नांदगावकर, अभिलाषा शिंदे ,अण्णा सावंत, अंकिता राणे, रमेश चव्हाण यांनी मेहनत घेतली. आभार तनिष्का लोकरे यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!