7.5 C
New York
Tuesday, March 11, 2025

Buy now

कलमठ बिडयेवाडी येथे होम मिनिस्टर स्पर्धेत साक्षी लबदे ठरल्या पैठणीच्या मानकरी

जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन ; उपविजेत्या भाग्यलक्ष्मी लोके, पाककला स्पर्धेत शितल जाधव प्रथम

कणकवली : कलमठ बिडयेवाडी येथे जागतिक महिला निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी महिलांच्या वतीने होम मिनिस्टर स्पर्धा व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रंगतदार झालेल्या होमिनिस्टर स्पर्धेत साक्षी लबदे या प्रथम विजेत्या खेळ पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत.तर
द्वितीय भाग्यलक्ष्मी लोके ,तृतीय नम्रता पुजारे विजेत्या ठरल्या आहेत. तर उत्तेजनार्थ राधिका पुजारे यांना विविध बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.होम मिनिस्टर स्पर्धेत ३५ महिलांनी सहभाग घेतला होता.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कलमठ बिडयेवाडी गणेश मंदिर येथे होम मिनिस्टर स्पर्धा व पाककला स्पर्धा महिलांच्या उपस्थितीत पार पडली.

पाककला स्पर्धा -विषय नाचणी या धान्यापासून पदार्थ बनविणे,या स्पर्धेत
प्रथम क्रमांक शितल जाधव (नाचणीची बर्फी) ,
द्वितीय गायत्री चाफेकर(नाचणीचे मोदक)
तृतीय शैलजा मुखरे(नाचणीचा खरवस)
उत्तेजनार्थ माधुरी फडके याप्रमाणे महिलांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन महिलांच्या हस्ते गौरवण्यात आले. होम मिनिस्टर स्पर्धेचे निवेदन सुप्रिया पाटील यांनी केले. पाककलेचा परीक्षण सेवानिवृत्त शिक्षिका मनाली चव्हाण, सुगंधा देवरुखकर यांनी केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या प्रीती मेस्त्री, मिताली वाळके ,शैलजा मुखरे ,भाग्यलक्ष्मी लोके, श्रावणी मेस्त्री,गीता मस्तमर्डी, रसिका चव्हाण, राधिका पुजारे, अर्चना लाड ,रत्नावली लाड यांच्यासह सर्व महिलांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमात म्युझिक सिस्टिम साठी सहकार्य प्रसाद मेस्त्री यांनी केले.तसेच या स्पर्धा पार पाडण्यासाठी मैथिली लोके, श्रद्धा मस्तमर्डी,रोशनी मस्तमर्डी, रिया चव्हाण या मुलींचे सहकार्य लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!