एस एम हायस्कूल येथे महिला दिनानिमित्त स्वरक्षण प्रात्यक्षिके सादर
कणकवली -महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. ८ मार्च या दिवशी एस् एम् हायस्कूल कणकवली यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ हा विषय मांडण्यात आला आणि स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
आपल्या देशाला शूर देवी-देवतांचा, क्रांतिकारकांचा, राजे महाराजांचा इतिहास लाभला आहे. हिंदवी स्वराज्य स्थापनेत छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच राजमाता जिजाऊंचा खूप मोठा वाटा आहे. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर या शूर वीरांगणांचा आदर्श घेऊन आपणही स्वसंरक्षणासाठी सिद्ध व्हा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री मयूर तवटे यांनी केले. त्यावेळी उपस्थितांना श्री. मयुर तवटे आणि कु. निना कोळसुलकर यांनी स्वसंरक्षणाच्या तंत्र पद्धती, कराटे प्रकार आणि दंडसाखळीची काही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
महिलांनी आपले संरक्षण कसे करावे यासाठी आपल्या जवळच असलेल्या साधनांचा उपयोग करून बचाव कसा करायचा याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रशालेच्या विद्यार्थिनी व एस्.एम्.हायस्कूलचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सहकारी शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गणेश कदम सर यांनी केले, तर सूत्र संचालन सौ. निधी तायशेटे मॅडम यांनी केले.