कणकवली : तालुक्यातील सिद्धेश भरत सावंत (वय २४, रा. तरंदळे पटेलवाडी) याने ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी बाराला गळफास लावून घेत आत्महत्या केली. याबाबत ची खबर सत्यवान लक्ष्मण राणे (तरंदळे, पटेलवाडी) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. मयत सिद्धेश हा मागील काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची फिर्याद मुंबई मुंबई मेघवाडी पोलिस ठाण्यात त्याच्या नातेवाईकांनी दाखल केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.