अधिक उपचारासाठी बांबूळी येथे हलविले
कणकवली : नांदगाव तिठा ओव्हर ब्रिज खाली आज सायंकाळी ५.४५ च्या सुमारास ट्रक व दुचाकी या दोन वाहनांमध्ये भिषण अपघात घडला .हा अपघात एवढा भिषण होता की, दुचाकीस्वाराचा एक पाय जाग्यावरच पूर्णत: तुटला तर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला. गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. व अधिक उपचारासाठी बांबूळी येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा ब्रिज खालून वळण घेत असताना हा अपघात घडला . या अपघातात नांदगाव तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष व एस टी महामंडळाचे सेवानिवृत्त कंट्रोलर ऊमर नावलेकर रा. (७०)नांदगाव तिठा या वयोवृद्ध दुचाकी चालक उमर नावलेकर यांचा एक पायच जाग्यावर तुटून पडला. घटना घडताच स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.तातडीने नरेंद्र महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून चालक पांडू तेली यांनी व ग्रामस्थांनी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.व अधिक उपचारासाठी बांबूळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात ब्रिज खाली सर्व्हिस रोड वाहने वळतात तेथेच झाल्याने दुसऱ्या ब्रिज बोगद्यातून वाहतूक सुरू आहे.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.मात्र हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.