27.2 C
New York
Friday, September 5, 2025

Buy now

सावंतवाडीत अबू आझमीच्या पुतळ्याचे दहन

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व शिवशंभूप्रेमींकडून निषेध

सावंतवाडी : समाजवादी पक्षाचे नेते, निलंबित आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करुन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला. आझमींच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण देशभरासह जिल्ह्यातही पडसाद उमटले आहेत. सावंतवाडी येथे अबू आझमीच्या पुतळ्याला जोडे मारत दहन करण्यात आले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व शिवशंभूप्रेमींनी निषेध व्यक्त केला.

अबू आझमी यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हटले होते. त्यांनी केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण देशभरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संतप्त पडसाद उमटले. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व शिवशंभूप्रेमींनी एकत्र येत अबू आझमीच्या पुतळ्याला जोडे हाणले. अबू आझमीन केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. यापुढे औरंग्याच्या समर्थनार्थ व हिंदू धर्माच्या विरोधात कोणीही वक्तव्य केलं तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा कृष्णा धुळपनावर यांनी दिला.

अबू आझमींचा प्रतिकात्मक पुतळा पायाने तुडवून त्याच्या वक्तव्याचा निषेध करत पुतळा जाळत आझमींच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव, जय श्रीराम, भारतमाता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी कृष्णा धुळपनावर, दिनेश गावडे, विनायक रांगणेकर, राजा घाटे, साईराज नार्वेकर, रोहन धुरी, जितेंद्र रायका, शुभम हिर्लेकर, अमोल साटेलकर आदिंसह विश्व हिंदू परिषद, बजरंगदल, शिवशंभूप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!