11.4 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

बस चालकाला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी ठाकरे सेनेच्यात्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

कणकवली : एसटी बस चालकाला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी कणकवली येथील उबाठा सेना पक्षाचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण ( रा. कणकवली कलमठ ) याच्यावर बस चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता १३२, १२१( १ ), ३५१ (२), ३५२ नुसार कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी बस चालक प्रदिप गिरीधर तांबे ( वय ४८ वर्षे, बेळणे खुर्द, फोंडाघाट ) यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, गेली ११ वर्षे पासून महाराष्ट्र परिवहन विभागामध्ये चालक म्हणून कर्तव्य बजावत आहे. तेव्हापासुनच वेंगुर्ला डेपो येथे नेमणुकीस आहे. मी वेगुलों ते कोल्हापुर या बस फेरीवर अधुनमधुन असतो. दिनांक ६ मार्च रोजी वेंगुर्ला ते कोल्हापुर जाणारी बस क्रमांक ( एम एच २० बीएक २७४६ ) या बस फेरीवर चालक म्हणुन ड्युटी नेमण्यात आली होती. दुपारी ०२.०० वाजता बस घेवुन वाहक तेजस जिवाजी जोशी अंदाजे दुपारी ०३.३५ वाजता ब्रीजच्या खालुन कणकवली नरडवे नाका येथे बस घेवुन आलो असता एका मोटारसायकलवर दोन पुरुष हे मी एस.टी बस क्रमांक ( एम एच २० बीएक २७४६ ) या गाडीच्या उजव्या बाजुस मोटारसायकल घेवुन येवुन शिवीगाळ केली. त्यावेळी सदर गोष्टीकडे दुर्लक्ष करुन चालक ताब्यातील एस.टी बस घेवुन एस.टी डेपो कणकवली येथे आले. बस फलाटवर लावुन गाडीतुन उतरुन कंट्रोल केबीन कडे जात असताना दोन अनोळखी व्यक्ती हे एस.टी फलाटावर आले व मला बघुन शिवीगाळ करत तु मला कट का मारलास असे म्हणाले. तेव्हा मी त्याला मी तुला कट मारलेला नाही, मी माझ्या ताब्यातील एसटी बस माझ्या साईडने चालवित होतो, असे सांगितले. त्यावेळी समोरील अनोळखी इसम याने चालकाला शिवीगाळी करुन हाताचे थापटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. सदरघटना चालु असताना रा.प. कणकवली आगारातील प्रदिप संजय परब (वाहतुक निरीक्षक), अजित पांडुरंग कदम (सहायक वाहतुक निरीक्षक), शिवाजी उमलु राठोड (सहायक वाहतुक निरीक्षक), दिलीप शांताराम जाधव (वरिष्ठ लिपीक) अन्य अधिकारी व कर्मचारी तसेच तेथे असलेले होमगार्ड सुमित वारंग व श्री. सुर्वे होमगार्ड आले व ते त्याला समजावुन सांगत असताना त्या दोन्ही व्यक्तींनी त्यांनाही शिवीगाळी करुन ते त्यांनी आणलेल्या मोटारसायकल क्रमांक (एमएच ०७ एएल ३५७८) या गाडीवर बसुन निघुन गेले. तद्नंतर कणकवली बसस्थानकात असलेल्या प्रवाश्यांकडून मला त्या अनोळखी व्यक्तीचे नाव रिमेश चव्हाण रा. कलमठ व दुसऱ्या इसमाचे नांव वर्दम (पुर्ण नांव माहित नाही) असे समजले, असे बस चालक प्रदिप गिरीधर तांबे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!