बस चालक व वाहकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की
चालक व वाहकाची कणकवली पोलीस ठाण्यात धाव
कणकवली : वेंगुर्ले – कोल्हापूर बस (एम एच २० बी एल २०४७) कणकवली नरडवे फाटा येथून कणकवली बस स्थानकाच्या दिशेने येत असताना उबाठा सेनेचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण व अन्य एक या दोघांनी ताब्यातील दुचाकीने बसला ओव्हरटेक करून बस समोर आले. बस समोर आल्यावर रिमेश चव्हाण यांनी बस समोर आपल्या ताब्यातील दुचाकी आडवी तिडवी चालवत कणकवली बस स्थानकात आले. यावेळी सदर बस चालकाची विचारणा करत बस चालकाच्या अंगावर गेले. यावेळी काहींनी अटकाव केला तेव्हा रिमेश चव्हाण हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने शिवीगाळ करून धिंगाणा करण्याची धमकी देऊ लागला.
यावेळी बस स्थानकातील सुरक्षा रक्षक, वाहतूक निरीक्षक प्रदीप परब, विनय राणे, ए.पी. कदम, श्री. जाधव यांनी त्याला पकडून स्थानकातील एका केबिन मध्ये बंद करून ठेवले. तसेच या घटनेची माहिती बस स्थानक प्रमुखांनी कणकवली पोलिसांना दिली. यावेळी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रंजित दबडे हे अन्य पोलीस सहकारी व होमगार्ड यांच्यासह कणकवली बस स्थानकात पोचले.
पोलिसांनी रिमेश चव्हाण याला विचारणा केली. यावेळी त्याने तुमच्याकडे तक्रार आहे का ? असा प्रश्नच पोलिसांना केला. तसेच त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागला. पोलिसांसमोर देखील पुन्हा धिंगाणा करणार असल्याचा इशारा देखील दिला. त्यानंतर तक्रार दाखल झाल्यावर मला अटक करा असे म्हणत पोलिसांसमोरच तो आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला घेऊन निघून गेला.
त्यांनतर वेंगुर्ला कोल्हापूर बस चे चालक वाहक याना रिमेश चव्हाण याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस कणकवली पोलीस ठाण्यात घेऊन गेले. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रिमेश चव्हाण याला केबिन मध्ये बंद केल्यावर कार्यालयामधील रजिस्टर अस्ताव्यस्त टाकले होते. चालकाने दिलेल्या माहितीनुसार रिमेश चव्हाण यांनी धक्काबुक्की केली आहे.