18.1 C
New York
Tuesday, August 26, 2025

Buy now

नितेश राणेंच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दापाश करणारा पक्षप्रवेश

हिंदुधर्मावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या घेतले पक्षात सामावून

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांनी आमदार म्हणून निवडून आल्यावर एक वक्तव्य केले की, मुस्लिमांची मते मला नको, मी फक्त हिंदूंच्या मतावर निवडून आलो असे वक्तव्य करणारे नितेश राणे यांनी कालच कणकवली तालुक्यातील वरवडे येथील उ.बा.ठा पक्षातील मुस्लिम बांधवांचा प्रवेश घेतला. पण यातील सगळेच कार्यकर्ते हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील न्हवते. याउलट एक वर्षापूर्वी हिंदुधर्मावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सलमान शेख याचा पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला. या सलमान शेख ला त्यावेळी त्यांच्याच वरवडे गावच्या नागरिकांनी बेदम चोप दिला होता. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला होता व शिवसेना उ.बा.ठा पक्षाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कणकवली पोलीस स्थानकात या सलमान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अश्या हिंदुधर्मावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सलमानला नितेश राणे यांनी पक्षात सामावून घेतलंय, आमदार नितेश राणे यांचं हे कुटच बेगडी हिंदुत्व, हिंदूचा गब्बर म्हणणाऱ्या नितेश राणे यांनी हिंदूधर्मावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या या सलमान शेख ला पक्षात कसे काय सामावून घेतले, सिंधुदुर्गची जनता नितेश राणेंच्या या बेगडी हिंदुत्वाला जाणून आहे. या आधी आर. एस. एस वर टीका करणारे आज हिंदुत्वावर जे प्रेम दाखवत आहेत हा नितेश राणेंचा फक्त मंत्रीपदासाठी केलेला अट्टाहास होता. आता त्यांना मंत्रिपद मिळाले आहे त्यामुळे त्यांना कोणीही चालत, असा घणाघाती आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला.
हिंदुधर्मावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या पक्षात सामावून घेतले हे नितेश राणे यांचे हिंदुत्व आर. एस. एस ला आता चालत काय ? अश्या व्यक्तीला तुम्ही पक्षात सामावून घेताय तर तुमचे हिंदुत्व राहील आहे काय ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नितेश राणे हे आर.एस.एस ला खुश करण्यासाठी हिंदुत्वाची शिकवण देत होते, पण आता मंत्री पद मिळाल्यानंतर हिंदुत्व हे बाजूला पडले आहे व मुस्लिम बांधवांची मते सुद्धा आता नितेश राणे यांना हवी आहेत यासाठी हे प्रवेश घेत आहेत.आता पर्यंत नितेश राणे यांनी घेतलेल्या प्रवेशात 20 टक्के प्रवेश मुस्लिम बांधवांचे आहेत. अशे हिंदुतत्वाचे खोटे रूप धारण केलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी टीका केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!