झाडांना पाणी घालणाऱ्या टँकर ला धडकला भाजी वाहतूक करणारा ट्रक
धडकेनंतर टँकरही झाला पलटी
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली येथे भाजी वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट गाडीचा अपघात झाला आहे. हा अपघात आज सकाळी १०:३० वा. च्या सुमारास घडला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार कणकवली च्या दिशेने येणाऱ्या लेनवर एक कंटेनर महामार्गावरील झाडांना पाणी घालत पुढे – पुढे कणकवली च्या दिशेने जात होता. याच दरम्यान मागाहून गोव्याच्या दिशेने जाणारा भाजी वाहतुक करणारा ट्रान्सपोर्ट चा ट्रक आला. एका वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात असताना भाजी वाहतूक करणारा ट्रक बाजूच्या पाण्याच्या टँकर ला घासला. यावेळी ट्रक चा हौदा बंदिस्त होता. परंतु अपघातात ट्रक एक बाजूने घासल्याने हौद्याचा पत्रा पूर्णपणे कट होऊन ट्रक मधील भाजी, फळ रस्त्यावर पडले होते. सुदैवानं अपघातात कोणालाही इजा झाली नाही. मात्र ट्रक मधील माल व ट्रक चे नुकसान झाले आहे. तसेच धडकेत पाण्याच्या टँकरचेही नुकसान झाले आहे.