23.5 C
New York
Wednesday, July 9, 2025

Buy now

विषारी द्रव्य प्राशन करीत कणकवली जळकेवाडी येथील युवकाची आत्महत्या

कणकवली : कामानिमित्त मिनी टेम्पो घेऊन तळेरे येथे जातो असे सांगून घरातून निघून गेलेल्या कणकवली शहरातील जळकेवाडी येथील ऋषिकेश विजय मालपेकर (३०) याने सावडाव येथे विषारी द्रव्य प्राशन केले. या युवकाला कणकवलीत खाजगी दवाखान्यात दाखल केले असता त्याचे निधन झाले. कणकवली शहरातील जळकेवाडी येथील व्यावसायिक ऋषिकेश विजय मालपेकर (३०) याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. हा प्रकार सावडाव येथे गुरुवारी २:३० वाजण्याच्या सुमारास येथे घडला.

आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. कणकवली जळकेवाडी येथे ऋषिकेश मालपेकर याचा आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय आहे. गुरूवारी १२ वाजण्याच्या सुमारास आईला आपण तळेरे येथे कामानिमित्त मिनी टेम्पो घेऊन जातो, असे सांगून तो बाहेर पडला. त्यानंतर कणकवली ते सावडाव दरम्यान त्याने विष द्रव्य प्राशन केले. त्यानंतर त्याने मित्र उत्तम पुजारे याला फोन करून सावडाव येथे येण्यास सांगितले. उत्तम हा सावडाव पोहोचला असता ऋषिकेश हा टेम्पोजवळ बेशुद्धावस्थेत पडलेला दिसून आला. उत्तम याने ऋषिकेश याला कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत किरण विजय मालपेकर यांनी (वय ३३, रा. जळकेवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. तपास कणकवली पोलीस करीत आहेत. ऋषिकेश याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!