कणकवली : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली येथे आज परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. सेमिनार मध्ये एक्सेल ओव्हरसीज संस्थेच्या संस्थापिका सौ आरती मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी एस बाडकर वाडकर यांनी प्रमुख वक्त्यांचे स्वागत केले. इंजीनियरिंग अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रदेशातील उच्च शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे व स्कॉलरशिप संदर्भात माहिती विद्यार्थ्यांना वक्त्यामार्फत देण्यात आली. माहितीचा उपयोग भविष्यात विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेण्यासाठी नक्कीच होईल असा विश्वास प्रिन्सिपल डॉ. डी. एस. बाडकर यांनी व्यक्त केला. या सेमिनारचे आयोजन ट्रेनिंग अँड पेमेंट विभाग यांच्यामार्फत करण्यात आले होते. त्याबद्दल संस्थापक खासदार नारायणगाव राणे, अध्यक्ष सौ नीलम ताई राणे, उपाध्यक्ष आमदार निलेश राणे तसेच सचिव मच्छीमारी उद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.