अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल; एक संशयित ताब्यात, आणखी काही असण्याची शक्यता
कुडाळ : कवठी-अन्नशांतवाडी येथील एकाचा त्याच्याच राहत्या घरात मृतदेह आढळून आला. अंगावर जखमा आणि आजूबाजूला पडलेले रक्त लक्षात घेता त्याचा खून झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे तर या खुनात आणखी काहीजण असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान या खुनामुळे कवठी गावात खळबळ उडाली असून मृत संदीप याचा भाऊ संतोष करलकर याने दिलेल्या तक्रारीनुसार निवती पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.