-6.5 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

व्हाट्सॲपवर महिलेचा फोटो ठेवून अश्लील चॅटिंग, आरोंदा येथील युवक ताब्यात

सावंतवाडी : व्हाट्सॲपवर महिलेचा डिपी ठेवून अनेकांशी अश्लील चॅटिंग करणाऱ्या आरोंदा येथील युवकाला सावंतवाडी पोलीसांनी दणका दिला. याबाबतची तक्रार संबंधित फोटो असलेल्या महिलेने सावंतवाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सायबर टीमच्या माध्यमातून त्या युवकाचा शोध घेत ताब्यात घेतले. ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली. गेले अनेक दिवस हा प्रकार सुरू होता, असे त्या महिलेचे म्हणणे आहे. दरम्यान उशिरा त्या युवकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्ती एका व्हाट्सॲप डीपीवर त्या महिलेचा फोटो वापरून अनेकांशी अश्लील संवाद सादत होता. याबाबतची माहिती तिला अनेकांकडून देण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या त्या महिलेने आज सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली व झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. यावेळी पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर आणि ठाणे अंमलदार प्राजक्ता कदम यांनी सायबर सेलच्या माध्यमातून संबंधित मोबाईल नंबर चा शोध घेऊन तो वापरणाऱ्या युवकाचा शोध घेतला. संबंधित युवक आरोंदा-खासकीलवाडा येथील असल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ त्या युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती तसेच या प्रकरणी त्याच्यावर सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!