20.6 C
New York
Wednesday, August 20, 2025

Buy now

किनळे येथील महिला चार दिवसांपासून बेपत्ता

सावंतवाडी  : सावंतवाडी तालुक्यातील किनळे वरचीवाडी येथील रहिवासी सौ. सुचिता सुभाष सोपटे (५९) ही महिला २३ फेब्रुवारी पासून बेपत्ता आहे. याबाबतची खबर तिची जाऊ सौ. गीतांजली गणेश सोपटे हिने सावंतवाडी पोलिसात दिली असून पोलीस तपास करीत आहेत.

गीतांजली सोपटे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सुचिता सोपटे पूर्वाश्रमीची कुंदना सदाशिव कावळे ही २३ फेब्रुवारी रोजी सकाळी एका कार्यक्रमासाठी जाते असे सांगून घरातून निघून गेली ती आजपर्यंत परत आली नाही. तिच्या आजूबाजूच्या परिसरात नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडे शोध घेतला असता तिचा थांगपत्ता लागला नाही. तसेच तिच्या मोबाईलवर देखील संपर्क होत नसल्याने अखेर ती नापता असल्याची खबर पोलिसात देण्यात आली आहे.
सुचिता सोपटे हिची उंची सुमारे पाच फूट असून डोळ्यांवर चष्मा आहे. तसेच दोन्ही हातात हिरव्या बांगड्या तसेच पिवळसर धातूच्या दोन बांगड्या असून काळ्या मळ्यांचे मंगळसूत्र व कानात कर्णफुले तसेच पायात पैजण व हाताच्या बोटात अंगठी असल्याचे वर्णन गीतांजली सोपटे यांनी केले आहे. याबाबत अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मुळीक करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!