हे उद्धव ठाकरेंचं सरकार नाही ; हे महायुतीच सरकार आहे
आमदार नितेश राणे यांचा संजय राऊत यांना टोला
कणकवली | मयुर ठाकूर : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर काल फायरिंग झाली. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी ही आमच्या महायुतीच्या सरकारची आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याला अतिशय कर्तबगार असे गृहमंत्री लाभलेले आहेत. त्यामुळे कोणाच्याही केसालाही धक्का लागणार नाही असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी जनतेला दिला. संजय राऊत ने समजून घेतले पाहिजे की हे काय महाविकास आघाडीचे सरकार नाही. हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल सरकार नाही. मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या घराच्या बाहेर जिलेटिन च्या कोण काड्या ठेवणार आणि मग सचिन वाझे सारखे तिकडचे पोलीस अधिकारी त्या पूर्ण षडयंत्राचा भाग राहणार. त्यामुळे हे काही उद्धव ठाकरे यांचे सरकार नाही. हे आमचं महायुतीचं सरकार आहे. इथे राज्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आमची आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना मुकेश अंबानींच्या घराच्या बाहेर जिलेटीनच्या काड्या ठेवल्या गेल्या आणि मग वसुलीचे रॅकेट जे देवेंद्र फडणवीस यांनी उघडीस आणले होते. तसे कुठलेही प्रकार आमच्या या महायुतीच सरकार असेपर्यंत होणार नाही, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी राज्याच्या जनतेला दिला आहे. यावेळी ते कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे ते म्हणाले, चिल्लर लोकांना पोलीस संरक्षण दिले, म्हणणाऱ्या संजय राऊत ने महाविकास आघाडी काळात वरून सरदेसाई ला पोलीस संरक्षण का दिले होते ? माजी मुख्यमंत्री नारायण राणेंसह भाजपा नेत्यांच्या पोलीस संरक्षणात कशी कपात केली. याचाही खुलासा राऊत ने करावा. असे आव्हान भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले.
भाजपाच्या मोदी गॅरंटी या जाहिरनाम्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत ने मागील १० वर्षे याच भाजपाच्या जाहिरनाम्याचा जप केला होता. मोदी करिष्म्यावर आपली पोळी भाजताना संजय राऊतला त्यावेळी भाजपाचा जाहीरनामा तोंडपाठ होता. स्वतःच्या बायकोपेक्षा भाजपच्या जाहिरानाम्याचाच जप राऊत करत होते अशी टीकाही आमदार राणे यांनी केली
मागील १० वर्षांतील ६ वर्षे मोदींच्या कृपेने राऊत चा मालक उद्धव आपले खासदार निवडून आणत होता. आणि आता संविधान धोक्यात असल्याचे म्हणता ? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाचा सर्वात मोठा अपमान ह्या संजय राजराम राऊत याने केला आहे. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकर यांना राजकीय चाली करून कसे ताटकळत ठेवले हे अवघ्या राज्याने बघितले आहे. महाविकास आघाडी मध्ये वंचित सामील न होण्याचे कारण संजय राजाराम राऊत असल्याची टीकाही आमदार नितेश राणे यांनी केली.