सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : चांगल्या कामात कोणी अपशकुन करू नये, मी कोणाच्या नाराजीवर लक्ष देत नाही, पक्षाचे हित माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे माझ्या राशीत रिक्वेस्ट हा शब्द नाही, मी त्यांना माझ्या भाषेत समजावेन, अशा कांनपिचक्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी आमदार राजन तेली यांना नाव न घेता दिल्या. श्री. तेली यांनी “सावंतवाडी विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या नियोजित सभा कोणाच्यातरी हट्टामुळे २ वेळा रद्द झाल्या, कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत करून सभेचे आयोजन केले होते, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनापासून माफी मागतो” असा स्टेटस मोबाईल वर ठेवून नाराजी व्यक्त केली होती, याबाबत श्री. राणे यांना विचारले असता त्यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले माझ्या दृष्टीने पक्षाचे हित महत्वाचे आहे, त्यामुळे कोणी काय स्टेटस ठेवला याबाबत मला माहिती नाही, कोणी चांगल्या कामात अपशकुन करू नये असे ते म्हणाले.