17.5 C
New York
Monday, September 8, 2025

Buy now

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले आई भराडी देवीचे दर्शन

आई भराडी देवी भाविकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेल ;पालकमंत्री नितेश राणे

आंगणेवाडी : आई भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मी देखील गेली अनेक वर्ष आईच्या आशिर्वादासाठी येथे येतो. भराडी देवीचा सर्व भक्तांवर कृपा आशीर्वाद आहे. या कृपाशीर्वादामुळे सर्व यशस्वी होत आहेत. आईच्या चरणी लीन होणाऱ्या प्रत्येक भक्ताला चांगले आरोग्य आणि सुख समृद्धी लाभू दे. नवसाला पावणारी आई भराडी देवी सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी आज आई भराडी देवीचे दर्शन घेतले. आंगणे कुटुंबीयांच्या वतीने आनंद आंगणे व काका आंगणे यांच्या हस्ते पालकमंत्री यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर ,राजू राऊळ,अशोक सावंत,पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसिलदार वर्षा झाल्टे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!