29.8 C
New York
Saturday, September 6, 2025

Buy now

होय..! कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे खोटंच बोलतायत

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा हल्लाबोल

कणकवली : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा माजी आमदार वैभव नाईक यांनी पाडल्याचे वारंवार सांगून फेक नारेटिव्ह फिक्स करत आहेत. जर एखादी व्यक्ती पुतळा पाडू शकत असेल तर पुतळ्याची उभारणी किती तकलादू होती याची कल्पना येते. नेव्ही ने शिवपुतळा बनविण्याचे काम शेवटच्या चार दिवसांत पूर्ण होणार नसल्याचे सांगितल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे शिवसेना उबाठा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले. शिवपुतळ्याला लावलेले स्क्रू नट लूज झाले होते हे पिडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे शासनाला कळवले होते. त्यामुळे ठेकेदाराने बनवलेला शिवपुतळा हा तकलादू बनवलेला होता हे दिसून येत होते. त्यामुळे दुर्घटना घडलेला शिवपुतळा हा निकृष्ट बनवलेला असूनही माजी आमदार वैभव नाईक यांनी पुतळा पाडल्याचे आमदार निलेश राणे खोटे बोलत आहेत असे उपरकर म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!