4 C
New York
Wednesday, March 4, 2026

Buy now

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दारिस्ते रस्त्याचे काम निकृष्ट

कणकवली : तालुक्यातील दारिस्ते येथील ग्रा. मा. ४२९ या रस्त्यावर आपल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत माजी खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीमुसार मंजुर झालेल्या रस्त्यावर सध्या काम चालू आहे. या कामात ज्या मोऱ्या बांधलेल्या आहेत त्यांना मजबुतीकरण केलेले नसून त्याचा पाया हा निकृष्ट स्वरुपाचा बांधलेला आहे. तसेच त्या मोठ्या अपघातास कारणीभूत ठरतील अशा स्वरुपाच्या बांधल्या गेल्या आहेत. या कामाची तक्रार युवा सेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्यामध्ये निवेदनाद्वारे केली आहे.

रस्त्याच्या भरावाला जी GSB वापरायची असते ते न वापरता मातीचा वापर केलेला आहे व त्यावर पाणी न वापरता रोलिंग केली जात आहे.

तरी माझी या कामावर तेथील ग्रामस्थ म्हणून तक्रार असून ही निकृष्ट कामाची सुधारणा केली नाही तर माजी खासदार यांच्या मार्फत कायदेशीर तक्रार करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या कामाचा दर्जा सुधारण्यात आला नाही तर गावातर्फे काम बंद आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी.

मोऱ्यांचे पाईपलाईन चुकीचे डायरेक्शन असल्यामुळे आणि साईट पट्टी नसल्यामुळे तिथे अपघात होण्याची शक्यता दाट असून हे कनिष्ठ अभियंता श्री. पुरी आणि वरीष्ठ अभियंता श्री. चव्हाण यांना ग्रामस्थांनी दर्शनास आणून देऊन सुध्दा काहीही बदल केला नसून, यावर प्रशासनाचा काम चालू असते वेळी कोणताही लक्ष नाही. जर येथे अपघात झाल्यास याला जबाबदार प्रशासन असणार आहे. यावर त्वरीत लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करुन बदल करुन घ्यावा अन्यथा येणाऱ्या ८ दिवसामध्ये रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!