23.2 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

रुग्णाला घेऊन जाणारी १०८ ची रुग्णवाहिका वाटेतच पेटली….

सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबुळी येथे रुग्णाला घेवून जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेने वाटेतच पेट घेतला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. ही घटना रात्री एक वाजण्याच्या सुमारास कोलवाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडली. गाडीत पुढे बसलेल्या डॉक्टरांना गाडीतून धूर येताना दिसला. त्यामुळे रुग्णांसह सर्वजण वेळीच बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर म्हापसा येथील अग्नीशमन बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. त्यात असलेल्या रुग्णांना अन्य एका रुग्णवाहिकेने उपचारासाठी बांबुळीकडे नेण्यात आले. संबंधित रुग्णवाहिका ही दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या वेंगुर्ला वजराठ येथील एका रुग्णाला लघवीचा त्रास जाणवत असल्यामुळे ती मागविण्यात आली होती. मात्र तो रुग्ण स्टेबल असल्यामुळे घटना घडल्यानंतर चालत बाहेर आला. अन्यथा अनर्थ घडला असता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!