15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

शिवजयंती निमित्त उभाबाजार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी : उभाबाजार बाल गोपाळ मित्र मंडळाच्यावतीने सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात पाककला स्पर्धा तसेच लहान मुलांचे खेळ दशावतार नाटक आदिचा यात समावेश करण्यात आला आहे.
सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात त्याच प्रमाणे यावर्षी ही शिवजयंती निमित्त कार्यक्रम होणार आहेत. यात मंगळवारी १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाककला स्पर्धा होणार सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यानी कृतिका कोरगावकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच याच दिवशी लहान मुलांसाठी संगित खुर्ची आदि कार्यक्रम तर बुधवारी सकाळपासून शिवजयंतीचे औचित्य साधून आर्कषक रांगोळी फुलांची सजावट करण्यात येणार आहे.

तर सायंकाळी शेखर शेणई पुरस्कृत ओमकार दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले परबवाडा आयोजित दशावतार नाट्य प्रयोग शिवाजी महाराज पुतळ्या जवळ होणार आहे. हे कार्यक्रम पाहाण्यासाठी जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यशवंत कोरगावकर यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!