गोवा बांबोळी येथील रुग्णालयात सुरू होते उपचार
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर गुरुवारी सायंकाळी ७:३० वा. झालेल्या अपघातात आईसह १० वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा – बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दक्ष जाधव ( वय १० वर्षे, रा. हळवल बौद्धवाडी ) असे त्या मूळचे नाव होते. अपघात दक्ष ला मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली होती. कंबरेतून खालील भाग धडक दिलेल्या ट्रक च्या चाकाखाली सापडला असल्याने काहीसा निकामी झाला होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार दक्ष ला गोवा – बांबोळी येथील रुग्णालयात दाखल केल्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. शस्त्रक्रिया देखील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सक्सेसफुल झाली होती. मात्र झालेल्या उपचारांना दक्ष ची साथ मिळत नव्हती. हळूहळू दक्ष ची तब्येत आणखीनच खालावू लागली आणि रात्री च्या वेळेस दक्ष ची प्राणज्योत मालावली.
दक्ष हा हळवल येथील शाळा हळवल नं.१ या शाळेत ४ थी इयत्तेत शिकत होता. अत्यंत हुशार आणि मनमिळाऊ असा विद्यार्थी म्हणून दक्षकडे पाहिले जात होते. मात्र अचानक काळाने घातलेल्या घाल्यात दक्ष चा मृत्यू झाला. दक्ष च्या निधनाचे वृत्त समजताच गावसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.