17 C
New York
Tuesday, March 11, 2025

Buy now

कणकवली गडनदी पुलावरील अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली गडनदी पुलावर गुरुवारी सायंकाळी ७:३० वा.च्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीवरील आई आणि मुलाला जोरधार धडक दिली होती. या अपघात प्रकरणी ट्रक चालक इक्‍बाल अब्‍दूल बेग (वय ५५, रा.चंदगड कोल्‍हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्‍यान अपघातातील गंभीर जखमी १० वर्षीय दक्ष जाधव या मुलावर गोवा बांबुळी येथे तर महिलेवर कणकवलीतील खासगी रूग्‍णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. गुरूवारी १३ रोजी रात्री ७:३० वा. च्या सुमारास गोव्याच्या दिशेने वाळू घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने (केए २२ सी ०८८२) ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला (एमएच ०३ सीजे ८०८३) मागून धडक दिली होती. या धडकेत दुचाकी वरील सोनाली जाधव (वय २८) आणि तिचा मुलगा दक्ष (वय १०) हे खाली कोसळले. तर ट्रकच्या पुढील टायरमध्ये दुचाकी अडकली.

अपघातानंतर ट्रक न थांबवता ट्रक चालक इक्‍बाल अब्‍दुल बेग (वय ५५, रा.चंदगड, कोल्‍हापूर) याने ट्रक गडनदी पुलाच्या साधारपणे दीडशे फूट पुढे नेऊन थांबवला. त्‍यानंतर स्थानिकांनी त्‍याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

या अपघात प्रकरणी हळवल बौद्धवाडी येथील रोहन मिलिंद जाधव यांनी आज कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली. त्‍यानंतर मद्यप्राशन करून भरधाव वेगाने वाहन चालवणे, तसेच सोनाली आणि दक्ष जाधव यांच्या अपघातास कारणीभूत ठरल्‍या प्रकरणी ट्रक चालक इक्‍बाल बेग याच्यावर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!