वेंगुर्ला : सिधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्ला, सावित्रीबाई महिला मंडळ, दलित सेवा मंडळ, डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवाडी येथे माता रमाई आंबेडकर यांची १२६वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्ष सुहानी जाधव, बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्लाचे कार्याध्यक्ष विठ्ठल जाधव, साजिरा बचत गट रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर मुंबईच्या अध्यक्ष अनघा जाधव, सेक्रेटरी समृध्दी सावंत, अनंत जाधव, सखाराम जाधव, गजानन जाधव, जयंत जाधव, महेंद्र जाधव, वाय.जी.कदम, मोनाली जाधव व नितीन जाधव, संदीप जाधव, राजन जाधव, गौतम जाधव, वृषाली जाधव, गितांजली जाधव आदी उपस्थित होते.