मालवण : महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या विद्यमाने अ वर्ल्ड इन मोशन या शैक्षणिक उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जेट टॉय (हवेवर चालणारी गाडी) या प्रकारात पंचक्रोशी सर्वोन्नती मंडळ रामगड संचलित प्रगत विद्यामंदिर रामगड मधील सहावीच्या वर्गातील आयुष तांबे, पूर्वा जिकमडे, चैतन्य जिकमडे, मनाली चव्हाण या विद्यार्थ्यांनी कणकवली विभागात प्रथम क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. पाचवीतील निर्वी घाडीगावकर, अनन्या परब, आर्यन मेस्त्री, वैष्णवी घाडीगावकर या विद्यार्थिनी ही अनेक उपक्रमांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. या अनोख्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली संशोधन वृत्ती आणि कल्पकतेचे अनोखे दर्शन घडवले. या स्पर्धेमध्ये अनेक शाळांनी भाग घेतला होता. संस्थेचे अध्यक्ष वा. स. प्रभुदेसाई, सचिव वि. म. मटकर, श्री. धुरी, संस्थेचे सर्व संचालक तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक ए. एम. वळंज, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.