बांदा : कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘महाराष्ट्र श्री’ चा मानकरी ठरलेला येथील बांदेश्वर फिटनेस सेंटरचा सदस्य संदेश सावंत यांचा सत्कार करण्यात आला. सावंत लवकरच भारत श्री स्पर्धेसाठी लखनऊ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. बांदेश्वर फिटनेस सेंटरमध्ये संदेश सावंत यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अक्षय पेडणेकर, भाऊ सावंत, शेखर चव्हाण, निलेश देसाई, यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. सावंत यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.