कुडाळ : शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या सायंकाळी ४ वाजता झाराप येथील श्री देवी भावई मंदिर येथे “सकल हिंदू समाज जनजागृती महाआरती”चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत या महाआरतीसाठी उपस्थित राहणार आहेत. सर्व सकल हिंदू समाज बांधवांनी उद्या सायंकाळी ३:३० वाजता हॉटेल आर. एस. एन. कुडाळ हायवे येथे उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी केले आहे.