रत्नागिरी : दारुच्या नशेत बेदरकारपणे बोलेरो गाडी चालवून रस्त्याच्या बाजुला पार्क केलेल्या दुचाकीला धडक देत अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वा. सुमारास घडली. आकाश निवास देसाई (२८, रा. शिवाजी पेठ, ता. करवीर, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोलेरो चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस शिपाई रोहन गमरे यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, शुक्रवारी रात्री संशयित आकाश देसाई हा दारूच्या नशेत आपल्या ताब्यातील बोलेरो (एमएच-०९-ईएम-८४२१) ही बेदरकारपणे माळनाका ते मारुती मंदिर असा जात होता. तो डायमंड बार समोरील रस्त्यावर आला असता त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या बर्गमन या दुचाकी (एमएच ०८-बीबी-३९४६) ला धडक देत अपघात केला. त्यानंतर दारूच्या नशेत रस्त्यावर उभे राहून हातवारे करत आरडा-ओरडा करत सार्वजनिक शांततेचा भंग केला.