5.5 C
New York
Thursday, March 13, 2025

Buy now

गुरूप्रतिपदेनिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

गुरुवार गुरुप्रतिपदारोजी अक्कलकोट शहरातून वटवृक्ष स्वामींच्या पारंपारीक पालखी सोहळ्याचेही आयोजन

मसूरे : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने गुरुवार दिनांक १३/०२/२०२५ रोजी माघ वद्य प्रतिपदा [गुरुप्रतिपदा] उत्सव श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात साजरा होत आहे. सकाळी ०८:३० वाजता देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते व सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी यांच्या उपस्थितीत पुरोहित मंदार महाराज पुजारी व पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मंदीरातील ज्योतिबा मंडपात देवस्थानचे लघुरुद्र अभिषेक होईल. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीच्या वतीने सोय करण्यात आली असून गर्दीमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता विशेष नियोजन करण्यात आले आहे. दुपारी ११:३० वाजता नैवेद्य आरती नंतर देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानकडून सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत भाविकांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम ज्योतीबा मंडपात संपन्न होतील. सायंकाळी ५ ते रात्री ०९:३० या वेळेत अक्कलकोट शहरातून भजन, दिंड्यांसह सवाद्य पालखी सोहळा संपन्न होईल.

हा पालखी सोहळा वटवृक्ष मंदिरातून फत्तेसिंह चौक, मेन रोड, कारंजा चौक, समाधी मठ, परतीचा मार्ग बुधवार पेठ, कारंजा चौक मार्गे, मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, स्वामी गल्ली मार्गे रात्री साडे नऊ वाजता पालखी सोहळा वटवृक्ष मंदिरात येईल. वटवृक्ष मंदिरात पालखी सोहळा आल्यानंतर देवस्थानकडून उपस्थित सर्व भाविकांना शीरा प्रसाद वाटप करणेत येऊन गुरु प्रतिपदा उत्सवाचा सांगता समारंभ होईल.

तरी सर्व भाविकांनी श्रींच्या व पालखी सोहळा दर्शनाचा, सेवेचा, व भोजन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!