आरोपीला पोलिसांनी केली अटक | कणकवली शहरातील घटनेने खळबळ
कणकवली : प्रेम संबंधानंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला आणि नंतर लग्नास नकार दिला. या प्रकरणत सौरभ बाबुराव बर्डे ( वय ३० रा. शिवाजीनगर गल्ली नंबर ३ ) याला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार आरोपी सौरभ बर्डे याने लग्नाचे आमिष दाखवून जानेवारी २०२४ ते ९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वारंवार बलात्कार केला.
त्यानंतर पिढीतेने लग्न संदर्भात विचारणा केली असता नकार दिला. याच कारणाने महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आरोपी सौरभ बर्डे याने पीडित महिलेवरती विद्यानागर येथे एका अपार्टमेंट मध्ये आणि आशिये रस्त्यावरील एका हॉस्पिटल समोरील एका बिल्डिंग मध्ये आणि मुडेडोंगरी येथे वारंवार बलात्कार केला. पीडित महिलेने फिर्याद दिल्यानंतर लागलीच पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे यांनी सहकारी पोलीस आणी होमगार्ड यांच्यासह संशयित आरोपीच्या कणकवली शिवाजी नगर येथे राहत्या घरी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे करत आहेत. सौरभ बर्डे याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.