5.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्या नंतर प्रशासनाने ती टपरी केली उध्वस्त

खानांची दहशत या जिल्ह्यात चालू देणार नाही; आमदार निलेश राणे

कुडाळ : मुंबई गोवा हायवे वरील कुडाळ तालुक्यातील झाराप तिठ्यावरील “त्या” टपरी चालकाबाबत आमदार निलेश राणे यांनी इशारा देताच प्रशासनाने ती चहाची टपरी जमीनदोस्त केली आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी प्रशासनाचे आभार मानले असून मात्र नियोजित तारखेला व आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने त्या ठिकाणी पोहचून तेथील ग्रामस्थांना धीर देऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे.

मुंबई गोवा हायवे वरील कुडाळ तालुक्यातील झाराप तीठ्यावर चार दिवसापूर्वी एका चहाच्या टपरीवर खान नमक व्यक्तीने व त्याच्या सग्या सोयऱ्यांनी पर्यटकांना बेदम मारहाण करून कपडे फाडून रस्त्यावर दोरीने बांधून ठेवले होते या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता. याची गंभीर दखल कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी घेऊन ४८ तासात पोलीस प्रशासनाने व महसूल प्रशासनाने ती अनधिकृत टपरी उध्वस्त केले नाही तर आपण १२ तारीख ला ती टपरी उध्वस्त करणार असा इशारा देताच अवघ्या काही तासातच सदरची टपरी प्रशासनाकडून उध्वस्त करण्यात आली आहे.

चार दिवसापूर्वी काही पर्यटक झाराप तिच्यावरील त्या टपरीवर चहा पिण्यासाठी बसले होते, चहात माशी असल्याचे दिसताच त्याने हॉटेल मालकाला याबाबत सांगितले व चहा बदलून देण्याची मागणी केली हॉटेल हॉटेल मालक खान यांनी तुला हीच चहा प्यावी लागेल व पैसे द्यावे लागतील असे सांगून त्याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली त्याच्यासोबत असलेल्या इतर पर्यटकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आपल्या खान कुटुंबियांना त्या ठिकाणी बोलवून घेऊन त्या पर्यटकांना वेदम मारहान केली. एकाला उघडे करून रस्त्यावर झोपवले व त्याचे हात व पाय घट्ट दोरीने बांधून घातले. याबाबतची कल्पना त्या पर्यटकांनी पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्या बंदिस्त केलेल्या पर्यटकांची मुक्तता केली व संबंधित पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलात्यातील एकाला अटक करण्यात आली.

याबाबत कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी कडक भूमिका घेत पर्यटकांना त्रास देणाऱ्या मुस्लिम खानांची इथे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही पोलीस प्रशासन महसूल प्रशासनाने त्या अनधिकृत टपरीवर त्वरित कारवाई करावी ती टपरी जमीनदोष करावी अन्यथा मी १२तारीख ला त्या ठिकाणी जाऊन ती टपरी काढून टाकणार आहे व त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व प्रसंगाला प्रशासन जबाबदार राहणार आहे असा इशारा दिला होता. निलेश राणे यांचा इशारा म्हणजे प्रत्यक्षात कारवाई या धास्तीने प्रशासनाने सदरची बेकायदा टपरी उध्वस्त केली आहे. सदरची टपरी उध्वस्त झाली तरी आमदार निलेश राणे हे नियोजित ठरलेल्या वेळेत त्या ठिकाणी जाऊन तेथील ग्रामस्थांना व इतर हॉटेल चालकांना धीर देणार आहेत व तेथील स्थानिक देवळात आरती करणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!